त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
For Vidhi,
Email:- info@vpandit.com
Contact Number:- 1800-890-1431
त्रिगुणात्मक
त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार
त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न
ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी
समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली
भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची
कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे
कैचा हेत ।
जन्ममरणाचाही
पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी
प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि
आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा
चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले
उन्मन ॥
मी तू पणाची झाली
बोळवण ।
एका जनार्दनी
श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
Write a public review